पुरंदर रिपोर्टर Live
सासवड (प्रतिनिधी)
सासवड पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक, खंडणी, जातीवाचक शिवीगाळ आणि छळ यासंबंधी गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून अनुश्का सचिन जाधव (वय ३६) आणि सचिन जाधव (वय ४३), दोघे राहणार सासवड, यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे सचिन जाधव हे वकील आहेत.
फिर्यादी पल्लवी आनंद सोनवणे वय २८ रा. एस व्ही नगर( हडपसर) यांच्या वडिलोपार्जित मिळकतीवरील जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गट क्रमां१३०३ व १३१३ मधील १८.५० गुंठे जमीन असल्याचा उल्लेख असताना नोंदणीकृत दस्तात १३९६, १३०४, १३२२, १३२४, १३४६, १३५७, १३७२, १४०४, १४१५, या गटांचा समावेश करून बनावट व्यवहार करण्यात आला. त्यातून ८ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पिस्तूल दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीने याविरोधात कायदेशीर कारवाई करून दस्त रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपींनी सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करत स्त्री म्हणून लज्जा निर्माण होईल अशा प्रकारे वर्तन केल्याचा आरोप आहे.
पुढील तपस पासून पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.

0 Comments